close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बाजू काढताना अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

बाजू काढण्याच्या नादात कंटेनर आणि जीपमध्ये भीषण अपघातात झाला. 

Updated: Jun 27, 2019, 09:31 AM IST
बाजू काढताना अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

पुणे : चाकण-शिक्रापूर महामार्गावर भोसे इथे बाजू काढण्याच्या नादात कंटेनर आणि जीपमध्ये भीषण अपघातात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जीपमधील वल्लभ रावता आणि संजय वाल्मीक यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक गंभीर जखमी झाला.

जीप चालक दीपक गोसावी याची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर चाकणच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघातानंतर ट्रकमधील रेडिएशन कॅमेरा हा अज्ञात व्यक्तीचा डबा समजून चोरून नेला आहे. परंतु हा कॅमेरा खोलण्याचा प्रयत्न केल्यास यातील केमिकलचा स्फोट होवून इजा होवू शकते. त्यामुळे पोलीस रेडीएशन कॅमेरा पळवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.