गुंड गजानन मारणे याच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा सत्कार; व्हिडिओ व्हायरल

गुंड गजानन मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 28, 2024, 11:49 PM IST
गुंड गजानन मारणे याच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा सत्कार; व्हिडिओ व्हायरल title=

Gaja Marane : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दही हंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे नवा वादाला तोंड फुटणार आहे. 

गजानन मारणे हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास असुन चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार असून आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोथरूड मधुन निवडणूक लढविण्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे. गजा मारणेने चंद्रकांत दादांचा केलेल्या सत्काराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याआधी पार्थ पवार, निलेश लंके यांनी गजा भेट घेतली होती त्यावेळी मोठी टीका झाली होती. 

गजा मारणे पुण्यातील नामचीन गुंड आहे. मारणे गँगचा म्होरक्या अशी त्याची ओळख आहे. तो कोथरूड भागात राहतो. जमीन व्यवहारांशी संबंधित अनेज कारनामे त्याच्या नावावर आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यांसह बेकायदा शस्त्र बाळगणे अशा कितीतरी गुन्ह्यांत त्याचा सहभाग आहे. त्याच्यावर मोकांतर्गत कारवाई झालेली आहे.

कोण आहे गजानन मारणे?

मुळशी पॅटर्नचा प्रोडक्ट
मारणे गॅँगचा म्होरक्या
खून, अपहरण, खंडणी, जमीन बळकावणे, अवैध शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे
आतापर्यंत जवळजवळ 25 गुन्ह्यांमध्ये आरोपी
मोक्कांतर्गत कारवाई
गजा मारण्याचे विविध पक्षांच्या नेत्यांसोबत संबंध