शरद पवार यांना केंद्राची ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले...

Chandrakant Patil on  Sharad Pawar : भाजप आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप दिसून येत आहे. 

Updated: Oct 13, 2021, 12:51 PM IST
शरद पवार यांना केंद्राची ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले... title=
संग्रहित छाया

नागपूर : Chandrakant Patil on  Sharad Pawar : भाजप आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या भाष्यावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपले म्हणणे मांडले आहे. केंद्राने ऑफर (central government offer) दिली असेल ते न स्वीकारणे एवढे पवार कच्च्या गुरुचे चेले नाही, असे म्हटले आहे. (Chandrakant Patil on central government offer to Sharad Pawar)

सीबीआय आणि ईडीकडून राज्यातील मंत्री आणि काही नेत्यांची चौकशी सुरु आहे. त्यावर शरद पवार यांनी टीका केली आहे. पवार म्हणाले भाजपकडून सत्तेत येण्यासाठी ऑफर होती. मी नाही म्हटले, म्हणून राष्ट्रवादीला त्रास दिला जातोय. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पवार हे सगळ्यांचे गुरू आहे. त्यामुळे पवार आणि त्यांचे शिष्य काही झाले तरी त्याचे खापर केंद्रावर फोडत आहेत. कोळशाबाबतही केंद्राने सांगितले होते पावसामुळे कोळसा कमी मिळेळ. वेळेच साठा करुन ठेवा. मात्र त्यांनी तो केला नाही. आता यांचे कसे झालेय, नाचता येईना आणि अंगण वाकडं, असा टोला त्यांनी राज्य सराकरला हाणला आहे.
 
महाविकास आघाडीतील नेत्यांची नाराजी काही ताटात पडून घेण्यासाठी असते. काही निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही, असे काँग्रेस नाराजीवर आपले मत व्यक्त केले. नागपुरात फडणवीस मुख्यमंत्री असताना खूप टीका व्हायची. आता नितीन राऊत झोपा काढत आहे का, असा सवाल त्यांनी केला.

राज्यातील महिला असुरक्षित झाल्या आहे. घरातील कुणाला घेतल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. आता खासदार सुप्रिया सुळे का बोलत नाही, माझ्या काळात खड्डे दिसत होते. सेल्फी काढत होत्या. आता बलात्कार, कोयत्याने वार करणे दिसत नाही का? शिवसेना नेत्या निलमताई कुठे आहेत, विद्याताई कुठे आहे, याबाबत का बोलत नाही. सत्तेसाठी किती अडजेस्टमेंट, महिलांच्या सुरक्षितेतही अडजस्टमेंट आहे का, आदी प्रश्न चंद्राकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केले.

फडणवीस मुख्यमंत्री विधानावर भाष्य

देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याचा अर्थ चुकीचा लावण्यात आला आहे. त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की, आजही जनता मी मुख्यमंत्री असल्यासारखी अपेक्षा करते. जे त्यांना मराठवाड्याच्या दौऱ्यात जाणवले. लोकांना उद्धवजीकडून अपेक्षा नाही. ते नाही बाहेर पडणार. हे लोकांनी गृहीत धरले. फडणवीस जिवाच्या आकांताने बाहेर पडले. त्यामुळे लोकांना असे वाटते, ते मुख्यमंत्री आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.