Chandrasekhar Bawankule: 'औरंगजेब जी...', चंद्रशेखर बावनकुळे हे काय बोलून बसले? राष्ट्रवादीचे नेते चिडले

मुघल बादशाह औरंगजेबाचा (Aurangzeb) आदरार्थी उल्लेख केल्यानं पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी औरंगजेबाचा उल्लेख 'औरंगजेब जी' (Aurangzeb ji) असा केला.

Updated: Jan 4, 2023, 11:14 PM IST
Chandrasekhar Bawankule: 'औरंगजेब जी...', चंद्रशेखर बावनकुळे हे काय बोलून बसले? राष्ट्रवादीचे नेते चिडले title=
Bawankule Mitkari

Maharastra Politics: विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनमध्ये (Nagpur Winter Session) छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना धर्मवीर नावाचा उल्लेख चुकीचा असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर वाद पेटला. मात्र अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपलं मत कायम असल्याचं म्हटलं आहे. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी औरंगजेबाचा आदरार्थी उल्लेख केल्याने राष्ट्रवादी (NCP) आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. (Chandrasekhar Bawankule Controversial statement on Aurangzeb Amol Mitkari critized marathi news)

मुघल बादशाह औरंगजेबाचा (Aurangzeb) आदरार्थी उल्लेख केल्यानं पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी औरंगजेबाचा उल्लेख 'औरंगजेब जी' (Aurangzeb ji) असा केला. पालघर दौऱ्यात जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना हिंदीतून बोलताना ते 'औरंगजेब जी' असं बोलून गेले. मात्र, त्यानंतर मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. 

बावनकुळेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर जोरदार टीका देखील होताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्वीट करत निशाणा साधलाय.

दरम्यान, क्रूरकर्मा औरंग्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे ज्यावेळी 'औरंगजेब जी' असं सन्मानानं म्हणतात, त्यावेळी धर्मवीर शब्दावर राजकारण करू पाहणारे औरंगजेबाचे बगलबच्चे बावनकुळे यांचा पुतळा जाळण्याची हिंमत दाखवतील का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

आणखी वाचा - Maharastra Politics: गाडीत बसलेल्या 'त्या' महिला कोण? कोणता कट रचला जातोय? आव्हाडांच्या Video ट्वीटने खळबळ!

दरम्यान, विशेषत: टिल्ल्या आमदार यांच्या पुतळ्याचा कडेलोट करेल का?, अशी टीका करत अमोल मिटकरी भाजपवर टीकास्त्र सोडलंय. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) स्टंटबाज माणूस आहे, नौटंकी आहे, त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात नौटंकी असतं. ते औरंगजेबजी यांना क्रूर मानत नाहीत, असं हिंदीमध्ये बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं.