Chandrpur Crime News Today: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रियकराच्या घरीच रक्ताच्या थारोळ्यात प्रेयसीचा मृतदेह आढळला होता. महाराणा प्रताप वार्डातील सम्यक चौकातील घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील महाराणा प्रताप वॉर्डातील सम्यक चौक परिसरातील एका तरुणीचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. याच प्रकरणातून आरोपीने तिची निर्घृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी महाराणा प्रताप वॉर्डातील सम्यक चौकात घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मृतक तरुणीचे नाव रक्षा कुमरे (२२) रा. महाराणा प्रताप वार्ड, सम्यक चौक बल्लारपूर असे आहे. तर सिनू दहागावकर (२९) असे आरोपीचे नाव असून, तो घटनेनंतर फरार झाल्याची माहिती आहे.
आरोपी सिनू दहागावकर हा आई रामबाई सोबत राहत आहे. त्याची आई रामबाई ही शुक्रवारी कामावरून घरी आली. त्यावेळी घरात एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले. तिचा मुलगा सिनू हा पूर्वीपासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती आहे. तो काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता. त्याने शुक्रवारी सायंकाळी रक्षा हिला स्वतःच्या घरी बोलावून घेतले. रक्षा घरी आल्यावर सिनूच्या मनात मात्र वेगळाच कट शिजत होता.
रक्षा सिनुच्या घरी येताच प्रेमप्रकरणावरून त्यांच्यात वाद झाला. याच वादातून सिनूने रक्षाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आणि घरातून पळ काढला. आरोपीची आई घरी आल्यानंतर ही घटना उजेळात आली. आईने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी पाजारी गोळा झाले. त्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरताच वॉर्डातील लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. त्याच दरम्यान बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक असिफराजा शेख पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत असून अद्याप मारेकऱ्याला अटक करण्यात आलेली नव्हती.
तडीपार आरोपीचा भरदिवसा सिनेस्टाइल पाठलाग करत खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूरज उर्फ बिहारी महतो असे तडीपार मृतक गुंडाचे नाव आहे. मृतक सूरज उर्फ बिहारी महतो हा तडीपार होता. तर आरोपी विपीन कुमार गुप्ता यावर सुद्धा खुनाचा आरोप होता. आज मृतक सूरज हा काही कामानिमित्त नाईक नगर येथे गेला होता. जेथे आरोपीचे विपीनकुमार गुप्तासोबत भांडण होतं. यावेळी दोघेही समोरासमोर आले आणि त्याचा वाद विकोपाला गेला. यावेळी एकमेकाला मारहाण करताना सुरज जेव्हा स्वतःचा बचावासाठी एका घरात घुसला त्याचा पाठलाग करत विपीनने त्याचावर धारधार शास्त्राने मारा करत त्याचा खून केला.