'राज्य आणि केंद्राने एकमेकांकडे बोट दाखवू नये'

 'खासदार म्हणून नव्हे तर छत्रपती घराण्याचा सदस्य म्हणून दौऱ्यावर'

Updated: Oct 21, 2020, 05:36 PM IST
'राज्य आणि केंद्राने एकमेकांकडे बोट दाखवू नये'

पुणे : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना राज्य आणि केंद्राने एकमेकांकडे बोट दाखवू नये असे आवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी केलंय. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे महा भयानक परिस्थिती आहे. शेतकरी जगावा यासाठी त्याला नैतिक आधार मिळायला हवा. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला मदत मिळावी. यासाठी मी खासदार म्हणून नव्हे तर छत्रपती घराण्याचा सदस्य म्हणून ४ दिवसांच्या दौऱ्यावर गेल्याचे ते म्हणाले. 

आपला पोशिंदा शेतकरी जगला पाहिजे.  माझं तुझं करू नका.केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करुन द्यायला पाहिजे. आताच मदत जाहीर केली नाही तर शेतकऱ्यांना रब्बी ची तयारी करता येणार नाहीत. सरकारने प्रशासनाला आदेश देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा असे आवाहन देखील संभाजी राजेंनी यावेळी केले. 

सरकारने विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची कॉलर पकडावी. त्यांनी जाचक अटी लादल्यात, असं असेल तर मदत कशी मिळणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामेच होत नाहीत अशा तक्रारी आहेत. 

शेतकऱ्यांना सरसकट ५० रुपये हेक्टरी मदत मिळावी ही शेतकऱ्यांची भावना आहे. माझ्यावर जबाबदारी दिली तर मी दिल्लीत पाठवपूरावा करण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

मी कुणाला दोष देणार नाही. राज्य सरकार असो वा केंद्र सरकार यांच्यावर मी  टीका करणार नाहीये. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. त्यात मला पडायचे नाही. आपण यासाठी सामूहिक प्रयत्न करायला पाहिजे एवढंच मला सांगायचे असल्याचे ते म्हणाले. 

महत्वाचे मुद्दे 

मी या विषयात राजकारण आणू इच्छित नाही. माझ्या प्रयत्नांना यश आलं नाही तर जे शेतकरी ठवतील मी त्यांच्यासोबत राहीन

वाहून गेलेल्या सोयाबीनचे पैसे मिळणार नाहीत
अतिवृष्टीमुळे अपरिमित नुकसान
इतर कामे बाजूला ठेवा
युद्ध पातळीवर काम करा
ओला दुष्काळ जाहीर करा

हेक्टरी ५० हजार मदत द्या अशी शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे

९९ टक्के शेतकऱ्यांना अँड्रॉइड म्हणजे काय माहीत नाही

मी चिखलात चालत गेलो, ट्रॅक्टरवर बसून गेलो. माझे दौरे ग्राउंडवर