ठाणे : ठाणे पोलिसांनी गेल्या एक महिन्यांपासून पाळत ठेवून दोन पेट्रोल पंपावर कारवाई केली होती. उत्तर प्रदेशमधील चिपचा वापर करून ग्राहकांच्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नवीन चिप पल्सरचा शोध ठाणे गुन्हे शाखेने लावला.
डोंबिवलीमधील पेट्रोलपंपासह ठाण्यातील १६ नंबररोडवर कारवाई केली. या प्रकरणात दोघांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आतापर्यंत सात ठिकाणी अशाप्रकारे धाडी टाकून जवळपास पाच आरोपीना पोलिसांनी अटक केली.
पेट्रोलपंपामध्ये छेडछाड करुन ग्राहकांची मोठी फसवणूक करणाऱ्या टोळीचा ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं पर्दाफाश केला होता. ही टोळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं पेट्रोल वेंडींग मशिनमध्ये छेडछाड करायची. पेट्रोल वेंडींग मशिनमध्ये झालेल्या छेडछाडीमुळे ग्राहकाला ४ ते ५ टक्के पेट्रोल कमी मिळायचं. त्यामुळे आधीच पेट्रोलचे भाव वाढत असताना ग्राहकांची मोठी फसवणूक व्हायची.
पोलिसांनी अटक केलेल्या टोळीने फक्त ठाण्यातच नव्हे तर पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद सारख्या महत्त्वाच्या शहरांतल्या पेट्रोलपंपामध्ये हेराफेरी केल्याचं उघड झालं होते.