उल्हासनगर : प्रेम प्रकरण तुटल्यानंतर आणि घरच्यांनी दोघांचे लग्न वेगवेगळ्या ठिकाणी ठरवल्यावर उल्हासनगरातील तरूणाने प्रेमिकेला व्हिडीओ कॉल करुन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष म्हणजे ही तरुणी सोमवारी लग्नाच्या बोहल्यावर चढली होती. २९ वर्षीय हनी असवानी या व्यापाऱ्याच्या मुलाचे आणि नालासोपारामध्ये राहणाऱ्या तरुणीचे प्रेमसंबंध होते. मागील वर्षी त्यांच्यात काही कारणानं वाद झाल्यानं त्यांचे प्रेम संबंध तुटले.
दोघांच्याही घरच्यांनी त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न ठरवले. महिन्यापूर्वी हनी आणि तरुणीची भेट झाली आणि त्यांच्यात भांडण झाल्यावर २१ मेला हनीनेआत्महत्या केली. आत्महत्या करत असल्याच्या तो म्हणाला. तिने त्याला आत्महत्येपासून रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानुसार तरुणीवर आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.