raj thackeray : राज ठाकरे हा तर 'दंगली'... भुजबळ यांची टीका

मस्जिदीवर असणाऱ्या भोंग्याच्या भूमिकेवरून राज ठाकरे यांच्यावर टीका होत आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांना सल्ला दिलाय. राज यांनी चुलत भावाला...   

Updated: Apr 17, 2022, 04:48 PM IST
raj thackeray : राज ठाकरे हा तर 'दंगली'... भुजबळ यांची टीका title=

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनेक वर्षे घालवली आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम त्यांनाच दिलंय.

एका बाजूला मुख्यमंत्र्यांचे ऑपरेशन होत आहे आणि तरीही ते सरकार चालवण्यासाठी शर्थ करताना दिसताहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी विघ्न बनवू नका. आपल्या चुलत भावाला जगू द्या. सरकार नीट सुरू आहे, कशाला अडचणीत आणता असा जेष्ठत्वाचा सल्ला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिलाय.

राज ठाकरे यांनी मस्जिदीवर असणारे भोंगे हटविण्यासाठी ३ तारखेपर्यंत मुदत दिलीय. राज ठाकरे हा 'दंगली' माजविण्याचा हेतू नाही ना? तुमची ही भूमिका राज्यात दंगली व्हाव्यात आणि सर्वसामान्य माणसं होरपळून निघावेत अशाच हेतूची दिसते. त्यानंतर हे केवळ किती लोक गेली हे मोजत राहणार असा उपरोधीक टोलाही त्यांनी लगावला आहे.