Nitin Gadkari On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवणातील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला. या विषयावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. अगदी पंतप्रधान मोदींपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी या प्रकरणी जनतेची माफी मागत भव्यदिव्य स्मारक उभारण्याचं आश्वासन दिलं आहे.
आता या प्रकरणी बोलताना राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळवळण मंत्री नितीन गडकरींनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. सदर पुतळा उभारताना स्टेनलेस स्टिलचा वापर करायला हवा होता, असं गडकरी म्हणाले आहेत. हे विधान करताना गडकरींनी समुद्र किनाऱ्यावरील खाऱ्या वाऱ्यांमध्ये स्टेनलेस स्टिल अधिक परिणामकारक ठरलं असतं असा संदर्भ दिला. दिल्लीमधील एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
नितीन गडकरींनी स्टेनलेस स्टिलचं महत्त्व अधोरेखित करताना आपल्या मंत्रालयाअंतर्गत त्याचा समुद्रकिनाऱ्यावरील बांधकामासाठी अधिक वापर करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. "मागील तीन वर्षांपासून समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात येणत असलेल्या रस्त्यांबरोबर त्यावरील पुलांसाठी स्टेनलेस स्टिलचा वापर करण्याचा माझा प्रयत्न आहे," असं गडकरींनी सांगितलं. यावेळेस गडकरींनी पूर्वी महाराष्ट्रात काम करतानाचा एक अनुभवही सांगितला.
नक्की वाचा >> मोठी बातमी! शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युलाच सांगून टाकला! म्हणाले, 'निवडणुकीनंतर...'
"मी मुंबईत होतो तेव्हा इथं 55 उड्डाण पूल बांधले. तेव्हा मला एकाने उड्डाण पुलांच्या पाहणीसाठी बोलावलं होतं. पुलांच्या बांधकामासाठीच्या लोखंडी सळ्यांवर तो कोटिंग पावडर वापरत असल्याचं मला दिसलं. त्यासंदर्भात विचारपूस केल्यावर त्याने यामुळे सळ्या गंजरोधक होतात असं सांगितलं. मात्र त्यानंतरही मला काही सळ्यांनी गंज पकडल्याचं दिसलं. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यापासून तीन किलोमीटरपर्यंतच्या परिघामधील अंतरातील बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर अधिक झाला पाहिजे, असं मत मी मांडत आलो आहे," असं नितीन गडकरी म्हणाले. याच संदर्भातून पुढे बोलताना गडकरींनी गडकरींनी स्टेनलेस स्टिलच्या वापर झाला असता तर पुतळा कोसळला नसता असंही नमूद केलं. "जर मलावणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर तो पुतळा कोसळला नसता," असं गडकरी जुन्या गोष्टीशी काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेशी जोड देत म्हटलं.
नक्की वाचा >> 'शेतकरी पण लाडका हे...', राज ठाकरेंची शिंदे सरकारकडे मागणी! कार्यकर्त्यांना म्हणाले, 'आपलं वाटोळं...'
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील अपघाग्रस्त पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटेविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. सिंधुदुर्गमधील पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी ही नोटीस जारी केली आहे. सध्या एकूण 7 पथकं जयदीपचा शोध घेत आहेत.
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
AUS
(70.3 ov) 225 (37 ov) 121
|
VS |
WI
143(52.1 ov) 27(14.3 ov)
|
Australia beat West Indies by 176 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.