छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं आज औरंगाबादेत अनावरण

शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याचा (chhatrapati shivaji maharaj statue) भव्य दिव्य अनावरण सोहळा आज (18 फेब्रुवारी) रात्री 10 वाजता पार पडणार आहे.   

Updated: Feb 18, 2022, 04:46 PM IST
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं आज औरंगाबादेत अनावरण title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याचा (chhatrapati shivaji maharaj statue) भव्य दिव्य अनावरण सोहळा आज (18 फेब्रुवारी) रात्री 10 वाजता पार पडणार आहे. शिवाजी महाराजांचा हा पुतळा देशातील सर्वात उंच अश्वरुढ पुतळा आहे. (chhatrapati shivaji maharaj statue of  will be unveiled by chief minister uddhav thackeray at kranti chowk in aurangabad on february 18 at 10 pm)
 
शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात उंच अश्वरुढ पुतळा असल्याचा मान हा औरंगाबाद शहराला मिळाला आहे. त्यामुळे या अनावरण कार्यक्रमासाठी औरंगाबादकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या पुतळ्याचं अनावरण हे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला होणार आहे.

या पुतळ्याचं अनावरण हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला अनेक मोठे नेते उपस्थित असणार आहेत.

पुतळ्याचं वैशिष्ट्य आणि संक्षिप्त माहिती 

शिवाजी महाराजांच्या या अश्वरुढ पुतळ्याची उंची ही 21 फूट आहे. पुतळ्याचं वजन हे 7 मेट्रिक टन इतक आहे. पुतळा बनवण्यासाठी ब्रॉंझ धातूचा (Gun Metal) वापर करण्यात आला आहे. पुतळ्याची चौथऱ्याची उंची 31 फूट इतकी आहे. तर चौथऱ्यासह पुतळ्याची उंची 52 फूट इतकी आहे.       

चौथऱ्याचं बांधकाम हे आरसीसीमध्ये असून चौथऱ्या भोवती स्टोन क्लायडिंग करण्यात आलं आहे. चौथऱ्या जवळच्या 24 कमानी आहेत. या 24 कमानीत 24 मावळ्यांच्या प्रतिकृती बसवण्यात आल्या आहेत. 

चौथऱ्या भोवती कारंजे तयार केलेले आहेत. तसंच हत्तीच्या सोंडेतून कारंजा सदृष्य पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था  करण्यात आलेली आहे.