मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

 अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहिले. ते माघारी परत असताना पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले.

Updated: Jul 7, 2017, 03:26 PM IST
मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले title=

रायगड  :  अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहिले. ते माघारी परत असताना पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी डोलवि-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास हेलिकप्टरमध्ये बसण्याकरिता जात होते. यावेळी हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेण्यास प्रारंभ केला. हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच  सुरक्षा रक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना  बाजूला खेचले. त्यामुळे ते थोडक्यात बचावले.
 
या घटनेनंतर हेलिकॉप्टरची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा लॅन्ड झाले. याच हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री फडणवीस मुंबईस रवाना झाल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांनी सांगितले. 
 
दरम्यान, २५ मे रोजी लातूरहून मुंबईस येत असताना मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता.