टेम्पोने तीन विद्यार्थ्यांना चिरडले

शहरालगत खोणीमध्ये मदरसामध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या तीन ८ ते ९ वर्षीय तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने धडा देऊन चिरडल्याने एकाच मृत्यू झाला असून दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Updated: Jul 7, 2017, 01:00 PM IST
टेम्पोने तीन विद्यार्थ्यांना चिरडले title=

भिवंडी : शहरालगत खोणीमध्ये मदरसामध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या तीन ८ ते ९ वर्षीय तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने धडा देऊन चिरडल्याने एकाच मृत्यू झाला असून दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

खोणी खाडीपार येथील अर्कम मस्जिद रोड वरील मदरसा मध्ये सकाळी दहा वाजताच्या सुमारास परिसरातीलच मोहम्मद अरमान मुस्ताक शेख , सारा शेख, हंगाला शेख ही तीन छोटी मुले जात असताना भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत ही तिन्ही मुले दबली गेली.

या अपघातात मोहम्मद अरमान शेख उपचारास नेत असताना मृत्यू झालाय तर सारा शेख व हंगाला यांना पायास दुखापत झाल्याने त्यांना सिराज रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे.