मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामथ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार 19 रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
सकाळी 09:00 वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण
सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे) , सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा
सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी, सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहरकडे प्रयाण, सकाळी 11:30 वा. अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी, सकाळी 11:45वा. अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण,
दुपारी 12:00 वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी
दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण,
दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी,
दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण,
दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी व नंतर सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण