आघाडी सरकार मजबूत आहे, आम्ही एकाच विचारांचे आहोत - उद्धव ठाकरे

आघाडी सरकार मजबूत आहे. आम्ही एकाच विचारांचे आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे.  

Updated: Feb 19, 2020, 06:20 PM IST
आघाडी सरकार मजबूत आहे, आम्ही एकाच विचारांचे आहोत - उद्धव ठाकरे title=

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकार मजबूत आहे. आम्ही एकाच विचारांचे आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावले आहे. आमचे सरकार जनतेला आपले सरकार वाटत आहे. गोरगरीबांचे सरकार आहे, म्हणून ही गर्दी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही एकत्र येण्यास उगाच एवढी वर्षे फुकट घालवली असं वाटतंय असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर एल्गार विषयात काही मतभेद अथवा अडचण नाही, कोणावर अन्याय होऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे असं अजित पवारांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करताना म्हणालेत, आज लोकांचे सरकार आलेले आहे. त्यामुळे काळजी करु नका. शिवनेरी आणखी कशी सजावयची याकडे आम्ही लक्ष देतो आहोत. हे आपलं वैभव आहे. असे सांगत त्यांनी शिवस्मारकाबाबत भाष्य केले. आता आपण एकत्र आलो आहोत ते चांगल्या आणि विधायक कामांसाठी आहोत. आता जे चांगलं आहे ते करुन दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊंच्या साक्षीने घेतो, असे मुख्यमंत्री म्हटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र कार्यक्रम पाहात होते. त्यावेळी एका कार्यकर्त्यांने आवज दिला. तेवढे शिवस्मारकाचे लवकर बघा. त्यावर मुख्यमंत्री म्हणालेत, होय सगळं बघतो. मी आता उत्तर देतो. अहो अजितदादा आपण एवढी वर्षे मधली आपण उगाच घालवली. उगाचच इतकी वर्षे वेगळं राहिलो. आधीच एकत्र यायला हवं होते, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.
 
शिवनेरीबाबत ज्या काही मागण्या येतील, त्या अटी-शर्थींविना पुढे न्यायच्या आहेत. शिवनेरीवर आपण एक लाईट अँड साऊंड शो सुरु करणार आहोत. सिंहगडावर जसा शो सुरु केला आहे. अगदी तसाच आपण शिवनेरीवरही सुरु करणार आहोत. शिवनेरी हे आपलं वैभव आहे, कारण तिथे आपले दैवत जन्माला आले. या किल्ल्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणालेत.