औरंगबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज शनिवारी औरंगबाद (Aurangabad ) दौऱ्यावर येणार आहेत. महापालिकेच्या विकासकामांचे ते उद्धाटन करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम निमंत्रित २०० लोकांसाठीच असणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
सर्वसामान्यांना कार्यक्रमाला येता येणार नाही, कोविडच्या प्रसारामुळे असा निर्णय घेतला असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत जी लोक मंचावर जाणार आहेत, त्या सगळ्यांच्या कोरोना चाचण्या आज करण्यात येणार आहे. आणि त्यानंतरच त्यांना प्रवेश असणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १२ डिसेंबरला औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करणार. या दौऱ्यात मुख्यमंत्र्याच्या हस्ते औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन, हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे उद्घाटन तसेच विविध विकास कामांचा होणार शुभारंभ. pic.twitter.com/nUHwXKbl2o
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 11, 2020
मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकण्यासाठी महापालिका काही ठिकाणी मोठ्या सक्रीन सुद्धा लावणार आहे, तर गर्दी होवू नये म्हणूण पोलिसांनी सुद्धा कडेकोड सुरक्षा ठेवण्यात येईल. दुपारनंतर कार्यक्रम भागातील रस्ते सुद्धा बंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांड्ये यांनी दिली.