पुणे : पुण्यात कोरोना कहर वाढतोच आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी मंचर शहरामध्ये आजपासून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पुकारला आहे. आजपासून ११ सप्टेंबरपर्यंत पुढील सात दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्याच्या चिंतेत वाढ होत आहे. पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एक लाखांवर गेला. ऑगस्ट महिन्यात पुण्यात सर्वाधिक वाढ झाल्याची माहिती आहे.
पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ८९ हजार ७२२ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख ३० हजार ३६६ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर पुण्यात आतापर्यंत ४३३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यातील कोरोना ऍक्टिव्ह रुग्णंची संख्या ५५०२३ इतकी आहे.
दरम्यान, राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ८ लाख ६३ हजार ६२ इतका झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत एकूण ६ लाख २५ हजार ७७३ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात २ लाख १० हजार ९७८ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
राज्यातील रुग्ण होण्याचं प्रमाण आता ७२.५१ टक्के इतकं झालं आहे. तर मृत्यूदर सध्या ३.०१ टक्के इतका आहे.