त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात पुजाऱ्यांचा तमाशा, एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण

या प्रकारामुळे मंदिर प्रशासनाची चांगलीच शोभा झाली. 

Updated: Mar 17, 2019, 07:48 PM IST
त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात पुजाऱ्यांचा तमाशा, एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण title=

नाशिक: त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात रविवारी पुरोहितांनी एकमेकांना केलेला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. काही भाविकांना थेट दर्शनाला नेण्यावरून हा वाद झाल्याचे समजते. त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्याबाहेरच सर्व भाविकांसमोर हा तमाशा झाला. यावेळी एका पुरोहिताने दुसऱ्या पुरोहिताला शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यामुळे मंदिर प्रशासनाची चांगलीच शोभा झाली. 

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. याठिकाणी दर्शनासाठी रोज भाविकांची गर्दी असते. त्यावेळी भाविकांच्या समक्षच हा संतापजनक प्रकार घडला. त्यामुळे समाजाच्या सर्वच स्तरांमधून या प्रकाराचा निषेध केला जात आहे. दरम्यान, पुरोहित महासंघाने या प्रकाराची गंभीर दखल घेत दोन्ही पुजाऱ्यांना कडक शब्दांत समज दिली आहे. मात्र, हा प्रकार पुजाऱ्यांमधील वैयक्तिक वादातून घडल्याचा दावा पुरोहित महासंघाचे अध्यक्ष गायधनी यांनी केला.