मुंबई : दुष्काळ नष्ट करण्यासाठी पाण्याचं विज्ञान समजून घेऊन, राज्यात जलयुक्त शिवारच काम सुरू आहे. पाणी फाउंडेशनने कामाच चांगलं मॉडेल तयार केले असून त्यामुळे गावा-गावात जलक्रांती होत आहे. यामुळे पाण्याचं सिंचन तर झालंच शिवाय, गावात लोकांच्यात एकी पण झाली, अस मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
सांगली जिल्ह्यातील आवंढी या गावात पाणी फोंडेशनने केलेल्या कामच पाहणी आज मुख्यमंत्र्यांनी केली. त्यावेळी मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामस्था बरोबर श्रमदान केले. त्याच बरोबर वृद्ध, महिला यांची त्यांनी आवर्जून विचारपूस केली. यावेळी एका वृद्ध महिलेने मायेने, मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर हात फिरवून त्यांना शुभेच्छा दिल्या.