या चिमुरड्याच्या २०८ देशांची नावं तोंडपाठ

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 5, 2017, 09:49 PM IST
 या चिमुरड्याच्या २०८ देशांची नावं तोंडपाठ title=

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण प्रचलित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच अशाच एका अचाट बुद्धीमत्तेच्या चिमुरड्याची भेट घेतली आहे.  हा  अवघ्या अडीच मिनिटांत तो २०८ देशांची नावं पटापट सांगतो. या भेटीचा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी शेअर केला आहे. 
अवीर प्रदीप जाधव असे या असमान्य मुलाचे नाव असून कमी वयात सहा राष्ट्रीय विक्रम त्याच्या नावावर आहेत. गेल्याच महिन्यात अवीरनं वेगवेगळ्या स्पर्धा जिंकून आपल्या नावे सहा विक्रम आपल्या नावे केले आहेत. 

मुख्यमंत्री झाले थक्क

 नकाशावरील २०८ देशांची नावं तो अचूक सांगतो तीही फक्त २ मिनिटं ५५ सेकंदांत. इतकंच नाही तर ध्वज पाहून किंवा नकाशा पाहून तो देश ओळखणं, देशांच्या राजधानीची नावं झटक्यात सांगतो. मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी त्यानं युरोपातील देशांची नावं अचूक सांगितली आणि उपस्थित सगळ्यांनाच त्यानं आश्चर्यचकित केलं.

जगाच्या नकाशातील भारत शोधण्याची त्याला उत्सुकता लागली होती. तेव्हा नकाशा खरेदी करण्याचा अट्टाहास त्याने आईकडे धरला होता.  नकाशातील भारत शोधल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. काही दिवसांनंतर जगाच्या नकाशातील इतर देशांची नावंही अवीर ओळखू लागल्याची आठवण त्याच्या आईने सांगितली.