संजय राऊतांवरील प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले...

शासन स्थरावर अडकलेल्या योजनांना गती मिळवून देण्यासाठी आढावा बैठक घेतली

Updated: Aug 2, 2022, 02:55 PM IST
  संजय राऊतांवरील प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले... title=

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पाच जिल्ह्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊतांच्या कारवाई संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे संतापलेले पाहायला मिळाले. 

संजय राऊत यांच्या घरी मिळालेल्या रोकड संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पैसे कोणाच्या घरी मिळालेत, माझ्या घरी मिळालेत का?असा प्रतिसवाल त्यांनी पत्रकाराला केला. तसेच पुढे ते म्हणाले, कोणाच्या मिळालेत, त्याच्यावर कोण लिहू शकतो.मी लिहू शकतो का, हे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, मी लिहू शकतो का त्यांच्या घरी जाऊन नाही ना, अशा कठोर शब्दांत त्यांनी उत्तर दिलं.  

शासन स्थरावर अडकलेल्या योजनांना गती मिळवून देण्यासाठी आढावा बैठक घेतली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर होतील असे आश्वासन दिले. तसेच पंचनामे 100 टक्के लवकर होतील आणि शेतकऱ्याना दिलासा द्यायचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री शिंदे य़ांनी सांगितले.