'अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांची...', बदलापूर प्रकरणावर मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Badlapur School Sexual Assault Case: बदलापुरातील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचा-यानं अत्याचार केले होते. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. 

प्रविण दाभोळकर | Updated: Aug 20, 2024, 12:03 PM IST
'अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांची...', बदलापूर प्रकरणावर मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
बदलापूर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Badlapur School Sexual Assault Case: बदलापुरातील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचा-यानं अत्याचार केले होते.. या प्रकरणी बदलापूरात संतप्त पडसाद उमटू लागलेत.. पीडित मुलींना न्याय देण्यासाठी बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन केलंय.. तसंच संतप्त पालकांनीही शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केलंय.. या घटनेच्या निषेधार्थ बदलापुरातील रिक्षाचालकांनी बंद पुकारलाय. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.  बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षक आणि मुलांना ने आण करणा-या सेविकांना निलंबित करण्यात आलंय.. तसंच कंत्राटी पद्धतीनं सुरु असलेला सफाई कामगारांचा ठेकाही रद्द करण्यात आलाय.. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणा-या पोलिस निरिक्षकाचीही बदली  करण्यात आलीये.

Add Zee News as a Preferred Source

काय म्हणाले मुख्यमंत्री?

बदलापूर लैंगिक शोषण घटनेची सखोल चौकशी केली जाईल. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कडक नियमावली बनवण्याच्या सुचना दिल्यायत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झी 24 तासकडे दिली आहे. शिक्षक, पोलीस कोणीही असू दे, अशा प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. अशा प्रकरच्या घटना खूप दुर्देवी आहेत. घटना घडू नयेत यासाठी सर्व बाबी केल्या जातील. अशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी काम केले जाईल. अशा प्रकारचे गुन्हे करण्यांवर कठोर कायदे आणले जातील. जेणेकरुन असे करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याशी देखील यासंदर्भात बोललो आहे. शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी नियमावली बनवली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बदलापूर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संस्थेच्या चौकशीचे पोलिसांना आदेश देण्याच आले आहेत. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाच चालवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

कळव्यातही धक्कादायक प्रकार 

कोलकात्यात महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातल्या रुग्णालयांतही सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्चचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना कळव्यात घडलीय. कळवा रुग्णालय परिसरात एका गतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आलाय. याप्रकरणी आरोपी प्रदीप शेळकेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.आज त्याला कोर्टात हजर करणार आहे .विशेष म्हणजे कळवा रुग्णालयात cctv आहेत मात्र कळवा रुग्णालयाच्या आवारात   cctv  नसल्याचं उघड झालंय.  कळवा पोलीस या बाबत, रुग्णालय प्रशासनाला cctv लावा असं पत्र देणार आहेत.दरम्यान या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटताहेत.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More