मुख्यमंत्र्यांकडून आदित्य ठाकरेंच्या खात्यात मोठे बदल

 राज्य सरकारच्या कारभारात सुरु असणाऱं....

Updated: Jul 17, 2020, 04:47 PM IST
मुख्यमंत्र्यांकडून आदित्य ठाकरेंच्या खात्यात मोठे बदल title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे बदल केले आहेत. राज्य सरकारच्या कारभारात सुरु असणाऱं बदलीचं सत्र इथंही पाहायला मिळालं. 

मनिषा पाटणकर- म्हैसकर यांची राज्य शिष्टाचार मंत्रालयाच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि प्रमुख राज्य शिष्टाचार अधिकारी पदावरून पर्यटन मंत्रालयाच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी पदावर बदली करण्यात आली आहे. तसंच पर्यटन मंत्रालयाच्या महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या मँनेजिंग डायरेक्टर अर्थात व्यवस्थापकीय संचालक पदावर मुंबई महापालिकेचे सहआयुक्त आशुतोष सलील यांची बदली करण्यात आली आहे. 

मोठी बातमी: शेखर गायकवाड यांची पुण्याच्या आयुक्तपदावरुन बदली

 

पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांना हिरवा कंदील, पण....

आदित्य ठाकरे यांच्या हाती असणाऱ्या मंत्रालयांत मुख्यमंत्र्यांनी अचानक केलेल्या या महत्वाच्या बदल्यांमुळे राजकिय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अपयशी ठरलेल्या अनेक अधिकाऱ्यांची उचलबांगडी करणयात आली आहे. प्रवीण परदेशी, शेखर गायकवाड यांच्या नावांच्या यामध्ये समावेश होता. पण, सध्या तुलनेनं पर्यटन खातं फारसं चर्चेत नव्हतं. तसंच कोरोनासंबधीच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत या खात्याची फारशी भूमिका नाही. तरीही अचानक मुख्यमंत्र्यांकडून या खात्यात इतके मोठे बदल का करण्यात आले, याविषयी आश्चर्य़ व्यक्त केलं जात आहे.