परभणी : शहराचं तापमान आज ६ अंश सेल्सिअस वर जाऊन पोहोचलेय. हे तापमान या हिवाळ्यातल सर्वाधिक कमी तापमान असून या बोचऱ्या थंडीमुळे परभणीकरांच नियोजन कोलमडलंय. ही बोचरी थंडी अजून वाढत जाण्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, साताऱ्यात हवामानातील बदलामुळे तापमानात बदल होत आहे. थंडीने महाबळेश्वर गारठल्याचे दिसून येत आहे. तापमान कमी होत महाबळेश्वरचा पारा ८.४ अंशावर आला आहे. गुलाबी थंडीचा अनुभव इथले पर्यटक घेत आहेत.
महाबळेश्वरचा पारा इथून पुढे हळू कमी होत ४ अंशावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पर्यटकांनी संख्याही वाढलेली दिसणार आहे.