सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : ऐश्वर्याचे वर्षश्राद्ध... 'तो' पुन्हा ढसा ढसा रडला... एश्वर्या कोण आणि तिच्यासाठी रडणारा तो कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ऐश्वर्या ही गाय आहे. तिच्यासाठी रडणारा तो या गाईचा मालक आहे. एखादा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे स्मरण करण्यासाठी वर्ष श्राद्ध घातले जाते. पंढरपुरमधील ( Pandharpur) या शेतकऱ्याने आपल्या गाईच्या मृत्यूनंतर तिचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आयोजीत केला होता(death anniversary of a cow).
जोतिराम आवताडे असं या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सोलापुरच्या माळशिरस तालुक्यातील फळवणी गावातील एक शेतकरी आहेत. आवताडे यांनी आपल्या गाईच्या प्रथम वर्षश्राद्धाचा कार्यक्रम जोरदार केला. यावेळी गाईच्या आठवणी जागवत कीर्तन ठेवण्यात आलं. महाराष्ट्रासह कर्नाटकमधील अनेक कार्यक्रमांत या गाईनं प्रथम क्रमांक पटकावला होता. या गाईमुळे आवताडेंना ओळख मिळाली होती.
फळवणी मधील शेतकरी जोतिराम आवताडे यांच्या खिलार गाईचे गत वर्षी निधन झाले. महाराष्ट्र सह कर्नाटक मधील अनेक कार्यक्रमात या गाईचा प्रथम क्रमांक आला होता. गाई मुळे शेतकऱ्याला ओळख मिळाली. तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत गाईचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम शेतकऱ्याने घेतला. यावेळी कीर्तन करून प्रसाद देण्यात आला.
ऐश्वर्या नावाची ही खीलार जातीची गाई, या गाईने आपल्या मालकाला आपल्या नावा प्रमाणे ऐश्वर्य मिळवून दिले. महाराष्ट्र सह कर्नाटक मधील अनेक कार्यक्रमात या गाईचा प्रथम क्रमांक आला होता. अनेक ठिकाणी या गाईला बक्षिसे मिळाली. गाई मुळे शेतकऱ्याला ओळख मिळाली. सर्व काही नीट सुरू असताना आजारी पडल्याने ऐश्वर्या या तीन वर्षाच्या गाईचा अचानक मृत्यू झाला.
ऐश्वर्याच्या मृत्यूमुळे आवताडे या शेतकरी कुटुंबाला धक्का बसला. गाई तर सोडून गेली पण तिच्या आठवणी कायम या शेतकरी कुटुंबा सोबत जोडलेल्या होत्या. त्यामुळे तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत गाईचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम शेतकऱ्याने घेतला. यासाठी कार्यक्रम पत्रिका तयार करून पशू पालक शेतकऱ्यांना आमंत्रण दिले. यावेळी कीर्तन करून प्रसाद देण्यात आला
अहमदनगरमध्ये बैलाचा वाढदिवस धुमधडाक्यात
अहमदनगर जिल्ह्यातील लिंगदेव गावात एका शेतकऱ्यानं बैलाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केलाय. 12 व्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला...आणि बैलाची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.