नाशिक: महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर कारभार आणि करवाढ याविषयावरून अविश्वास प्रस्ताव येत्या शनिवारी आणण्यात येणार आहे. त्याआधीच आता मुंढे यांनी नरमाईची भूमिका घेतलीय. करमूल्य दरवाढ २९ पैशांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मोकळ्या जागेची रेटेबल व्हॅल्यू ३ पैशांऐवजी केवळ ५ पैशाप्रमाणे आकारली जाईल.
दत्तक नाशिकचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी तुकाराम मुंढेंवर सोपवली. मात्र, आता आयुक्त मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी भाजपनंच पुढाकार घेतलाय.
काय आहे प्रकरण आणि सध्यस्थिती ? पाहा व्हिडिओ