धक्कादायक! स्वामी समर्थ गुरुपीठात 50 कोटींचा घोटाळा?

तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरमधील सुप्रसिद्ध स्वामी समर्थ गुरुपीठात (swami samarth gurupeeth) 50 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Updated: May 16, 2022, 07:55 PM IST
 धक्कादायक!  स्वामी समर्थ गुरुपीठात 50 कोटींचा घोटाळा? title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : धक्कादायक बातमी समोर आली आहे.  तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरमधील सुप्रसिद्ध स्वामी समर्थ गुरुपीठात 50 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुरुपीठ संचालकांविरुद्ध निधीच्या अपहाराची तक्रार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. (complaint of scam rs 50 crore in swami samarth gurupeeth at nashik further investigation by police started)

नक्की प्रकरण काय? 

निविदा न काढता कामांवर खर्च केल्याचा ठपका संचालकावंर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी गुरुपीठाच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे. याबाबत  धर्मादाय आयुक्तांचा अहवाल येणार आहे. हा अहवाल आल्यानंर पुढील योग्य की कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय. 

धर्मदाय संस्थेत धर्मदाय संस्थेचा निधी हा राष्ट्रीयकृत बँकेत ठेवणे कायद्याने बंधनकारक असतं. तसंच सर्व कार्यकारी मंडळाचे आणि विश्वस्तांचे कर्तव्य असतं. पण आरोपी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगमताने फौजदारी स्वरूपाचे कटकारस्थान आणि फसवणूक करून मोठ्या प्रमाणावर खालील नमूद केल्या प्रमाणे संस्थेचा निधी राष्ट्रीय बँकत न ठेवता स्वतःच्या हातात ठेवला आणि संस्थेच्या निधीचा अपहार केला, असा आरोपही करण्यात येतोय.