राहुल गांधीची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत....

राहुल गांधीची भारत जोडो यात्रा नादंडे मध्ये दाखल झाली. हातात धगधगती मशाल घेऊन नांदेडमध्ये दाखल झालेल्या राहुल गांधी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

Updated: Nov 7, 2022, 10:29 PM IST
राहुल गांधीची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत.... title=

Maharashtra Politics, नांदेड : काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. भारत जोडो यात्रे अंतर्गत राहुल गांधी यांनी आज नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव घेत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचा दणक्यात शुभारंभ केला. छत्रपती शिवाजी महारांजासमोर नतमस्तक होत यात्रेला सुरुवात होत आहे. याचा मला अभिमान वाटत असल्याचे राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले. या सभेत राहुल  गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली. 

GST, नोटबंदीमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान

देशात बेरोजगारी वाढतेय. व्यापारी  तसेच शेतकरी अर्थ व्यवस्थेचा कणा आहे.  चुकीच्या प्रकारे GST वसुली, नोटबंदी यासारख्या निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले. या निर्णयामुळे अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले व्यापारी आणि शेतकरी यांचे कंबरडे मोडले असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी महागाईबद्दल बोलत नाहीत

देश तरुणांना रोजगार देऊ शकत नाही. एकीकडे बेरोजगारी आणि दुसरीकडे महागाई यात जनता अडकलेय. पेट्रोल-डिझेल यांचे दर वाढलेत, गॅस महाग झाला आहे. याबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नसल्याचा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

दोन महिन्यांपूर्वी कन्याकुमारीपासून सुरु झाली भारत जोडो यात्रा

दोन महिन्यांपूर्वी कन्याकुमारीपासून सुरु झालेली यात्रा थेट जम्मू काश्मिरमध्ये गेली होती. यानंतर आज राहुल गांधीची भारत जोडो यात्रा नादंडे मध्ये दाखल झाली. हातात धगधगती मशाल घेऊन नांदेडमध्ये दाखल झालेल्या राहुल गांधी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सह काँग्रेसचे दिग्गज नेते यात सहभागी झाले.  

पुढचे 15 दिवस राहुल गांधीची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात राहणार 

पुढचे 15 दिवस राहुल गांधीची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात राहणार आहे.  महाराष्ट्रात ही यात्रा तब्बल 344 किमीचा प्रवास करणार आहे.  ही पदयात्रा महाराष्ट्रातील नांदेड, वाशिम, अकोला, हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी महाराष्ट्रात एकूण 14 ठिकाणी थांबणार आहेत. ही यात्रा 15 विधानसभा आणि 6 लोकसभा मतदारसंघात भेट देणार आहे.