काँग्रेस आणि घराणेशाही पाळणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंकडून शिकावं- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींची घराणेशाहीवर टीका

Updated: Apr 9, 2019, 01:24 PM IST
काँग्रेस आणि घराणेशाही पाळणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंकडून शिकावं- पंतप्रधान मोदी title=

लातूर : औसामध्ये आज युतीची सभा झाला. या सभेत पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ३ वर्षानंतर एकाच व्यासपीठावर आले. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना सत्तेत सोबत असूनही भाजप आणि मोदी सरकारवर टीका करत होती. पण लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा दोघांमध्ये युती झाली. पंतप्रधान मोदी यांनी आजच्या सभेची सुरुवात मराठीतून केली. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना माझा लहान भाऊ असं संबोधित केलं. यावेळी त्यांनी बाळासाहेबांची देखील आठवण काढली.

काँग्रेस आणि विरोधक देशविरोधी विचारांचे आहे. धारा ३७० काढू नये म्हणून काँग्रेस विरोध करते. काश्मीरमध्ये त्यांना हिंचा पसरवण्यासोबत चर्चा करायची आहे. पाकिस्तानपण हेच म्हणतो आहे. काँग्रेसमध्ये अक्कल असती तर त्यांनी फाळणीच होऊ दिली नसती. त्यामुळे पाकिस्तानच तयार झाला नसतो. देशद्रोहाचा कायदा हटवण्याची घोषणा काँग्रेसकडून होत आहे. काँग्रेसने आरशात जावून तोंड पाहावं. याच काँग्रेसने बाळासाहेबांचं नागरिकत्व काढून घेतलं होतं. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. काँग्रेसने बाळासाहेबांकडून शिकायल हवं.

'काँग्रेस-राष्ट्रवादी घराणेशाही आणि गटबाजीमध्ये अडकून पडले आहेत. काँग्रेस एकाच परिवाराच्या विकासात लागले आहे. या पक्षांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकलं पाहिजे. बाळासाहेब स्वत: मुख्यमंत्री होऊ शकले असते. उद्धव ठाकरे यांना देखील मुख्यमंत्री ते करु शकले असते. पण त्यांनी त्या मार्गावर नाही गेले. देशातील घराणेशाही पाळणाऱ्या पक्षांनी बाळासाहेबांकडून शिकावं.'