मुंबई : वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडीत यावं यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी आंबेडकरांच्या भेटीसाठी अनुकूल आहेत. दरम्यान, आंबेडकरांच्या सर्व अटी मान्य करण्याची लेखी हमी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिली आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचे आव्हान असताना कॉंग्रेसने मोटबांधणी करण्यास जोरदार तयारी केली आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार केला.
कॉंग्रेस पूर्ण करू शकणार नाही अशा अटी आंबेडकरांनी ठेवल्या आहेत पण कॉंग्रेस तरीही सकारात्मक असल्याचे चित्र आहे. राहुल गांधी हे प्रकाश आंबेडकरांशी यांच्याशी चर्चा करायला तयार आहेत. आपण या चर्चेला बसण्याची तयारी आंबेडकरांनी करायला हवी हेच यातून दिसत आहे. प्रकाश आंबेडकर या भेटीसाठी आतूर आहेत का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
मी 100 स्मार्ट सिटी बनवणार असे 2014 च्या निवडणूकीत मोदी म्हणाले होते. मुंबईला स्मार्ट सिटी बनवण्याची गरज नाही. मुंबई ही जगातील स्मार्ट सिटी असल्याचे राहुल गांधी कालच्या भाषणात म्हणाले म्हणाले. मोदी जिकडे जातील तिकडे लांबच लांब भाषण ठोकतात आणि आश्वासने देतात. शेतकरी कर्जमाफी, 15 लाख 2 कोटी रोजगार असे तोंडाला येतील ते आकडे सांगतात मात्र त्यांनी यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही.
सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात लढायला तयार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसला आपण संघाच्या विरोधात लढण्यासाठी तयार असल्याचे सिद्ध करावे लागेल. अन्यथा चर्चेचे गाडे पुढे सरकणार नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले होते. तसेच भारिप बहुजन महासंघ उमेदवार जाहीर केलेल्या जागांवर १०० टक्के लढेल. जागावाटपाच्या चर्चेत यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले होते.
एवढेच नव्हे तर लोकसभेच्या सगळ्या ४८ जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छा होती, त्यासाठी चर्चाही झाली, पण आमचा लढा गैरसंविधानवादी आणि संविधान न मानणाऱ्या संघाशी आहे. संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी काँग्रेसने आराखडा द्यावा, अशी मागणी आम्ही अनेकदा केली होती. मात्र, तरीही काँग्रेसने कोणताही प्रतिसाद न दिल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे आंबेडकर यांनी सांगितले होते. त्यामुळे राहुल गांधी हे सर्व प्रकरण कसे हाताळतात हे पुढच्या काळात कळणार आहे.