कोरेगाव भीमा पुस्तकाचा वाद; लेखकाला जीवे मारण्याची धमकी, आज सुनावणी

Koregaoan Bhima Book Controversy : एका पुस्तकावरून झालेल्या वादाची बातमी. कोरेगाव भीमा (Koregaoan Bhima) विषयाच्या पुस्तकाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

Updated: Feb 25, 2022, 10:47 AM IST
कोरेगाव भीमा पुस्तकाचा वाद; लेखकाला जीवे मारण्याची धमकी, आज सुनावणी title=

पुणे : Koregaoan Bhima Book Controversy : एका पुस्तकावरून झालेल्या वादाची बातमी. कोरेगाव भीमा (Koregaoan Bhima) विषयाच्या पुस्तकाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुस्तक लिहिणाऱ्या रोहन माळवदकर (Rohan Jamadar) यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. (Controversy -Threats to kill Koregaoan Bhima Book's Author) याबाबत माळवदकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

पुस्तक प्रकाशन झाल्यापासून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे लेखक रोहन माळवदकर यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. आज माळवदकर यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात युक्तीवाद होणार आहे.

रोहन माळवदकर यांचे '1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाई वास्तव' हे (1 January 1818 Koregaon Bhima Ladhaiche Vastav) पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकातील अनेक गोष्टी चुकीच्या (Koregaoan Bhima Book Controversy) असल्याची तक्रार दलित संघटनांनी पुणे पोलिसांत दाखल केली. या पुस्तकावर बंदी घालण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली होती. तेव्हापासून वाद सुरूच आहे. हे सगळं प्रकरण सर्वात आधी 'झी 24 तास'ने समोर आणले होते.