जेवणाची चव वाढवणाऱ्या कोथंबिरला बाजारभाव नाहीच...

सोमवारी मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने कोथींबीरीचे बाजारभाव ढासळले.

Updated: Jun 7, 2022, 12:12 PM IST
जेवणाची चव वाढवणाऱ्या कोथंबिरला बाजारभाव नाहीच...  title=

हेमंत चापुडे (झी मिडिया जुन्नर पुणे) : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर आणि मेथीचे बाजार भाव चांगलेच ढासळले आहेत. दोन दिवसापूर्वी हिच कोथंबिरची जुडी 35 रूपयाला विकाली जात होती. जिला आज 15 रुपये जुडी पर्यंत विकली जात आहे. शनिवारी नारायणगाव बाजार समितीत कोथिंबिरीला 35 रुपये जुडी तर मेथी ला 27 रुपये जुडीला बाजारभाव मिळाला होता, परंतु हेच बाजार भाव रविवारी 25 रुपये जुडी पर्यंत खाली आले.

सोमवारी मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने कोथींबीरीचे बाजारभाव 15 रूपये जुडी पर्यंत, तर मेथीचे बाजारभाव 17 रूपये जुडी पर्यंत गडगडले, असून दोन दिवसात कोथींबीर मेथीचे बाजारभाव निम्म्याने गडगडले आहे.. 

आधीच उष्णतेमुळे धना मेथीवर परिणाम होत आहे. झाडं कोलमडून जात आहेत, तर जुडी बाजारात येई पर्यंत सुकून देखील जात आहे. परंतु या दुष्काळाची दाहकता असताना कसंबसं मोठ्या प्रमाणात खर्च करून शेतकऱ्यांनी कोथींबीर मेथी तर पिकवली, मात्र आता बाजार भाव ढासळल्याने धना मेथी उत्पादक शेतकर्‍यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

परंतु असं असलं तरी ग्राहकांना याचा फारसा फायदा झालेला नाही. कारण ग्राहकांना तेवढ्याच पैशांमध्ये कोथंबीर बाजारात उपलब्ध आहे.