कोरोनाचा धोका : गावातील निर्बंध अधिक कडक करण्याचे आदेश, तर गुन्हे दाखल कणार

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. (Coronavirus in Maharashtra ) त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Updated: May 3, 2021, 10:03 AM IST
कोरोनाचा धोका : गावातील निर्बंध अधिक कडक करण्याचे आदेश, तर गुन्हे दाखल कणार title=
संग्रहित फोटो

 मुंबई / सांगली  : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. (Coronavirus in Maharashtra ) त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र, ग्रामीण भागात ती वाढत आहे. गावात रुग्णसंख्या वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका रोखण्यासाठी आता गावातील कोविडचे (Covid-19) नियम अधिक कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच यापुढे कोरोना बाधित रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास तातडीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश देण्यात आले आहेत. (Corona crisis: Orders to tighten restrictions on Covid in the village)

राज्यात अनेक जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा, बेड मिळत नाहीत. त्यामुळे कोविडचे नियम कडक करण्याची मागणी होत आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही जास्त असल्याने तासगाव तालुक्यात ज्या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त असेल त्या गावामध्ये निर्बंध अधिक कडक करा. कोरोना बाधित रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास तातडीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. तासगाव तहसिलदार कार्यालयात कोरोना सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पंचायत समिती सभापती कमलाताई पाटील, प्रांताधिकारी समीर शिंगटे, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे आदी उपस्थित होते.

 तासगाव शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी नगरपालिकेने उभारलेले रूग्णालय तातडीने सुरू करण्याबाबतची कार्यवाही करावी. या रूग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी पुढील कार्यवाही करावी. तासगाव तालुक्यामध्ये कोरोना टेस्टींग वाढविण्यावर भर देण्यात यावा. तालुक्याला व्हेंटीलेटरचा अधिक पुरवठा होईल याबाबत जिल्हास्तरावर कार्यवाही करावी, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्याला रेमडेसिवीर इंजेक्शनची रोजची मागणी सुमारे 900 इतकी आहे. तरीही रेमडेसिवीरचा पुरवठा अपुरा होत आहे. प्राप्त होणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे योग्य प्रकारे जिल्ह्यात वाटप करण्यात यावे. ज्या ठिकाणी रूग्णसंख्या अधिक आहे त्या ठिकाणी रेमडेसिवीरचे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना करण्यात याव्यातआणि जनता कर्फ्यु बाबत निर्णय घ्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जे कोरोनाबाबतचे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारावा आणि निर्बंधांची अंमलबजावणी कडकपणे करावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी तासगाव येथील ग्रामीण रूग्णालयाची पाहणी करून या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधांबाबत ज्या उणिवा असतील त्या तातडीने पूर्ण कराव्यात, असे आदेश दिले.