सांगली : कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेत. इस्लामपुरातील तब्बल २३ जणांना कोरोनाची बाधा झालीय. सौदी अरेबियातून प्रवास करुन आलेल्या कुटुंबाशी संबंधित हे रुग्ण असल्याचे सांगण्यात येते आहे. सांगलीतल्या रुग्णांची संख्या आता २३ झाली आहे. याच कुटुंबातशी संबंधित आणखी १२ जणांचे आज रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यामुळे एकाच कुटुंबातील तब्बल २३ सदस्यांना कोरोना झाल्याने सांगलीतल्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
#BreakingNews । सांगलीत कोरोनाचे २३ रुग्ण, १२ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह, ६ महिला आणि ६ पुरुष कोरोना बाधित#COVID2019 #CoronavirusOutbreak #CoronaVirusUpdates #Lockdown21 #coronavirus @ashish_jadhao pic.twitter.com/swSrMhPWOk
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 27, 2020
नव्या रुग्णांमध्ये सहा महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. तर पुण्यातून एक चांगली बातमी आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवातीला कोरोना बाधित झालेल्या तीन रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. हे तीन ही रुग्ण दुबई वरून आले होते. १४ दिवसानंतर घेतलेल्या दुसऱ्या चाचणीचा अहवाल ही गुरुवारी रात्री उशिरा निगेटिव्ह आल्यानंतर या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित १२रुग्ण होते, त्यातल्या तीन जणांना आता घरी सोडण्यात आले आहे. त्याचवेळी एकही नवा रुग्ण नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने दोन कोटीची मदत जाहीर करण्यात आलीय. यातले दीड कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले जाणार आहेत. तर उर्वरित पन्नास लाख रुपये कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला देण्यात येणार आहेत.