ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यात काल २ हजार १७३ व्यक्ती कोरोनाबाधित आढळले. एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 90 हजार इतकी झाली आहे. (२२ मार्च २०२१) तर काल एकाच दिवशी कोरोनाने 10 जणांचा बळी घेतला आहे. ठाणे जिल्ह्याला कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा घट्ट होऊ लागला आहे. गेले काही दिवसात रुग्णसंख्येत कमालीची वाढ होतांना दिसत आहे. आज ठाणे जिल्ह्यात 2 हजार 173 नवे बाधित रुग्ण आढळले, तर काल दिवसभरात १० बाधितांचा मृत्यू झाला.
ठाणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 16 हजार 550 इतकी आहे. ठाण्यात संसर्ग झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण २.२० टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख 67 हजार 674 नागरीक संसर्गातून बरे झाले आहेत.
संसर्ग झालेल्या लोकांवर उपचार करण्याचे प्रमाण 92.11 टक्के येवढे आहे. तर शेजारच्या पालघर जिल्ह्यात कोरोनाचे 47 हजार 666 अँक्टीव केसेस आहेत. तर कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 209 येवढी आहे.
मुंबईतील कोरोना मिटर
कोरोना हद्दपार होणार, अशी स्थिती असताना ठाण्यात फेब्रुवारीच्या मध्यानंतर आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. २ फेब्रुवारीला मुंबईतील ३३४ वर घसरलेली रुग्णसंख्या आता २ हजारावर गेली आहे. काही दिवसांपासून धारावीतही कोरोनाने डोकेवर काढले आहे. धारावीत ८ मार्चला दिवसभरात १८ रुग्ण आढळल्यानंतर आजपर्यंत सलग रुग्णसंख्या वाढते आहे.