पुणे : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉननेही राज्यात हातपाय पसरले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पालिका प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.
आज पुण्यातही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात १ ली ते ८ वी पर्यंतचे वर्ग ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या कोरोना आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ९ वी आणि १० वीचे वर्ग सुरु राहतील. कारण त्यांचं लसीकरण सुरु आहे.
पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत शाळा बंद करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
१ ते ८ वीचे ऑनलाईन क्लासेस सुरु राहणार आहेत.