पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात नव्याने ७५ रुग्ण सापडल्याने बाधितांचा आकडा सात हजाराच्या घरात पोहोचण्यास मदत झाली आहे. तर मृतांची एकूण संख्या ३०० वर पोहोचली आहे.
पुणे शहरात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. पुण्यात केवळ शहरात साडेपाच हजारांहून अधिक रूग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७५ नवे रुग्ण आढळले असून जिल्ह्यातली कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६ हजार ७१६ इतकी झाली आहे. मुंबईनंतर पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण जास्त असल्याचे दिसून येत आहे.
BreakingNews । पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता । पुण्यात नवे ७५ रुग्ण । बाधितांचा आकडा सात हजाराच्या जवळ । मृतांची एकूण संख्या ३०० वर. https://t.co/HOK58ckddW @ashish_jadhao
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 28, 2020
राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.५ दिवस होता तो काल १४.७ दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ३१.५ टक्के एवढे आहे. मात्र, पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात काल कोरोनाच्या २१९० नवीन रुग्णांचे निदान झाले। सध्या राज्यात ३७ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल ९६४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १७ हजार ९१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५६ हजार ९४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. सध्या राज्यात ५ लाख ८२ हजार ७०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३७ हजार ७६१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.