Corona : शिवसेना खासदार कृपाल तुमाने 'सेल्फ क्वारंटाईन'मध्ये

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Updated: Mar 21, 2020, 06:18 PM IST
Corona : शिवसेना खासदार कृपाल तुमाने 'सेल्फ क्वारंटाईन'मध्ये title=

रामटेक : देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना व्हायरसचा फटका शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनाही बसला आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने हे सेल्फ क्वारंटाईनमध्ये गेले आहेत. १४ दिवसांसाठी कृपाल तुमानेंना वेगळ राहावं लागणार आहे. कृपाल तुमाने हे लोकसभा खासदार दुष्यंत सिंग यांच्या संपर्कात आले होते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

१८ तारखेला लोकसभेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कृपाल तुमाने आणि दुष्यंत सिंग उपस्थित होते. भाजप खासदार दुष्यंत सिंग हे गायिका कनिका कपूरने दिलेल्या पार्टीमध्ये सहभागी झाले होते.

कनिका कपूरला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. लंडनवरुन परतल्यानंतर कनिका कपूरने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला राजकीय नेतेही उपस्थित होते. यामध्ये उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जयप्रताप सिंग, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, दुष्यंत सिंग यांचा समावेश होता. या सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

दुसरीकडे कोरोना असल्याची माहिती लपवल्यामुळे कनिका कपूरविरोधात उत्तर प्रदेशमधल्या लखनऊच्या सरोजिनी नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘बेबी डॉल’, ‘बीट पे बूटी’, ‘टुकुर टुकुर’ अशा अनेक गाण्यांच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली कनिका शुक्रवारी भारतात परतली. त्यानंतर तिला जवळपास पाच दिवस ताप होता. हे सर्व कोरोनाचे लक्षणं असल्याचे तिच्या लक्षात येताच तिने स्वत:ची कोरोना चाचणी केली आणि तिचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे तिला लखनऊच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.