अरे बापरे.... लसीकरणासाठी मध्यरात्रीपासून नागरिकांनी लावल्या रांगा

सध्या राज्यात व्हॅक्सिनचा तुटवडा (Corona vaccine shortage) पुन्हा जाणवत असल्याने याचा परिणाम हा लसीकरणावर ( Corona vaccine) होत आहे.  

Updated: Jul 12, 2021, 11:24 AM IST
अरे बापरे.... लसीकरणासाठी मध्यरात्रीपासून नागरिकांनी लावल्या रांगा title=

आतिश भोईर / कल्याण : सध्या राज्यात व्हॅक्सिनचा तुटवडा (Corona vaccine shortage) पुन्हा जाणवत असल्याने याचा परिणाम हा लसीकरणावर ( Corona vaccine) होत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने नागरिकही लस घेण्यावर भर देताना दिसत आहे. लसीचा तुटवडा असल्याने लस (Corona vaccine shortage) मिळण्यासाठी नागरिक रात्रापासूनच रागेंत उभे राहत आहेत. लसीकरणासाठीमध्य रात्री तीन वाजल्यापासून नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. दरम्यान, खाजगी रुग्णालयात लसीकरण होत आहे मात्र, केडीएमसीकडे का नाही, अशी तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कल्याण- डोंबिवलीमध्ये (Kalyan-Dombavali) पालिकेच्या लसीकरणाला चांगलाच ब्रेक लागला आहे. त्यामुळेच लसीकरणासाठी नागरिकांची संख्या जास्त आणि लसींचा साठा मात्र कमी अशी अवस्था झाली आहे. त्यामुळेच आज मोठ्या विश्रांतीनंतर कल्याण डोंबिवलीत होणाऱ्या लसीकरणासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात लस घेण्यासाठी लोकांनी मध्यरात्रीपासून  रांग लावली आहे. याठिकाणी ऑफलाईन लसीकरणाचे कुपन घेण्यासाठी उसळलेल्या गर्दीने तर हद्दच केली. 

आचार्य अत्रे रंगमंदिरापासून सुरू झालेली ही गर्दी थेट छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत गेलेली पाहायला मिळाली. ज्यावरून कल्याण डोंबिवलीतील लसीकरणाच्या चित्राचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे अधिकाधिक लसींचा पुरवठा आणि त्याद्वारे अधिकाधिक लोकांचे लसीकरण हाच एकमेव पर्याय सध्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध आहे.खाजगी रुग्णालयात लसीकरण होतो म पालिकेकडे लस का उपलब्ध होत नाही असा सवाल नागरिकांनाकडून केला जात आहे. जोपूर्ण क्षमतेने कधी राबवला जातो, याची सर्वानाच प्रतिक्षा आहे.