नाशिक : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोणीही गर्दी करु नये तसेच गर्दीला प्रोत्साहन देऊ नये, असे राज्यशासनाने स्पष्ट बजाबले आहे. मात्र, जमावबंदीचा आदेश धाब्यावर बसविण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याने नाशिकमध्ये चार लॉन्स धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
#BreakingNews । नाशिकमध्ये चार लॉन्स धारकांवर गुन्हे दाखल । जमावबंदी आदेशाच उल्लंघन केल्याने गु्न्हा दाखल । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जमावबंदीचे आदेश काढले होते.#CoronaInMaharashtra #KOVID19 @ashish_jadhao #coronavirus pic.twitter.com/eFfsnWWWlj
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 20, 2020
जमावबंदी आदेशाच उल्लंघन केल्याने आडगाव पोलीस ठाण्यात लक्ष्मी लॉन्स, इंदू लॉन्स, यशवंत लॉन्स आणि जय गुरुदत्त लॉन्स यांच्यावर १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जमावबंदीचे आदेश काढले होते. त्यानुसार सूचना वजा नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र लग्न समारंभावर बंदी असतानाही लॉन्स धारकांनी उल्लंघन केल्याने त्यांच्यावर नाशिक पोलिसांनी कारवाई केली आहे.