धक्कादायक ! महाराष्ट्रात अखेर कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

या दोन्ही जणांनी दुबईला प्रवास केल्याचं सांगण्यात येत आहे. दुबईहून आल्यानंतर हे रूग्ण कुणा-कुणाच्या संपर्कात आले होते, त्यांचा शोध घेतला जात आहे.

Updated: Mar 10, 2020, 12:00 AM IST
धक्कादायक ! महाराष्ट्रात अखेर कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला title=

पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रूग्ण पुण्यात आढळला आहे. दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या दोनही जणांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच पुण्यातील नायडू रूग्णालयात यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नायडू रूग्णालयात विलिगीकरण कक्षात यांना ठेवण्यात आलं आहे. हे एकूण 40 जण दुबईला गेले होते, 1 तारखेला हे पुण्यात परतले आहेत, या 40 जणांचा शोध घेतला जात असून, हे कुणा कुणाच्या संपर्कात आले आणि यांची आरोग्य तपासणी देखील केली जाणार आहे.

या दोन्ही जणांनी दुबईला प्रवास केल्याचं सांगण्यात येत आहे. दुबईहून आल्यानंतर हे रूग्ण कुणा-कुणाच्या संपर्कात आले होते, त्यांचा शोध घेतला जात आहे.

यामुळे या रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन, त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही याची तपासणी केली जाणार आहे. ज्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबवण्यात मदत होणार आहे.