पुणे: आयटी हब आणि मुंबईनंतरचे राज्यातील सर्वात मोठे शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील कॉसमॉस बॅंकेचा सर्वर हॅक करून सुमारे ९४ कोटी रुपये लंपास करण्यात आले आहेत. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आलीय. ११ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला आहे. ऑनलाईन पद्धतीनं ही रक्कम हाँगकाँग मधील एका बँकेच्या खात्यात वळवण्यात आलीय.
कॉसमॉस बँकेच्या ग्राहकांसोबत घडलेला हा प्रकार समजताच शहरात एकच खळबळ उडाली. सध्या तरी हा प्रकार कॉसमॉस बँकेसोबत घडल्याचे पुढे आले आहे. मात्र, इतरही बँकांसोबत हा प्रकार घडला आहे का, याबाबत शहरातील नागरिकांत चर्चा सुरू आहे. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रामाणत फसवणुक होण्याची पुणे शहरातील बहुदा ही पहिलीच वेळ असावी. फसवणूकीचा प्रकार लक्षात येताच बँक व्यवस्थापनाने पोलिसांशी सपर्क साधला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या फसवणूकीत ग्राहकांचे पैसै विदेशातील बँकांमध्ये वळविण्यात आले आहेत.