Video Viral! डोंबिवली ते सीएसटी किसिंगचा तरुण-तरुणीचा नॉनस्टॉप सपाटा

डोंबिवली काय सीएसटी आलं, पण त्यांनी किस करणं सोडलं नाही, कोण हा नवा इम्रान हाशमी

Updated: Mar 11, 2022, 05:44 PM IST
Video Viral! डोंबिवली ते सीएसटी किसिंगचा तरुण-तरुणीचा नॉनस्टॉप सपाटा title=

कल्याण : मध्य रेल्वेच्या (Central Railway) एका गर्दीच्या रेल्वे स्थानकावर एका कपलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video) चांगलाच व्हायरल होत आहे. रेल्वे स्थानकावर असलेल्या लोकांची परवा न करता हे कपल खुलेआम किसिंग करताना या व्हिडिओत दिसत आहे. हो दोघंही महाविद्यालयीन तरुण-तरुणी आहेत.

हा व्हिडिओ डोंबिवली रेल्वे स्थानकावरचा (dombivali railway station) आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक हे प्रवाशांनी नेहमीच गजबजलेलं असतं. अशा गजबजलेल्या भर गर्दीतच या तरुण-तरुणीचे अश्लिल चाळे सुरु होते. स्टेशनवरच्या एका प्रवाशाने त्यांचे हे अश्लील चाळे मोबाईल कॅमेरात कैद केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. काही प्रवाशांनी त्या दोघांना विरोध केल्यानंतर ते तिथून निघून गेले. पण यानंतर तसाच प्रकार त्यांनी सीएसएमटी प्लॅटफॉर्मवर सुरु केला. तिथला व्हिडिओही एका प्रवाशाने काढला आहे. 

लोकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर डोंबिवली रेल्वे पोलिसांनी याची दखल घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी करणं चुकीचं असून आम्ही त्या दोघांविरोधात एनसी नोंदवली असल्याचं रेल्वे पोलिसांनी म्हटलं आहे.