अमरावती : कोरोनाचा शिरकाव (Coronavirus) आता गावागावात पाहायला मिळत आहे. शहराकडून कोरोना (Covid-19) हा गावाकडे पोहोचला. पहिली लाट ओसरत असताना दुसऱ्या लाट आली आणि कोरोना (Coronavirus) बाधितांचा आकडा झपाट्याने वाढायला लागला. याचा ताण आता आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. औषध, बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न सुरु आहेत. असे असताना नागरिक कोविडचे नियम पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे आता अमरावतीत ( Amravati) कोरोनालाच (Coronavirus) रस्त्यावर उतरावे लागले आहे. (Amravati Corona Awareness)
काय सांगता, अमरावतीत चक्क कोरोनाविषय जनजागृती करण्यासाठी कोरोनाच रस्त्यावर अवतरल्याचे पाहायला मिळाले. राज्यात कोरोनाची स्थिती भयावह होत चालली आहे. अमरावतीतदेखील अनेकांची स्थिती सध्या गंभीर आहे. रोज कोरोनाबधितांचे आकडे आणि रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे मृत्यूचा दरही वाढला आहे. तरीसुद्धा नागरिक घराबाहेर पडत आहे. त्यामुळे आता अमरावतीत वाहतूक पोलिसांनी एक नवी शक्कल लढवली आहे.
कोरोना नियमांची जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी मानवरुपी एक कोरोना विषाणूचा मिकी तयार केला असून त्याच्यामार्फत जनजागृती केली जात आहे. अमरावतीच्या जयस्तंभ चौकात वाहतूक पोलिसांसोबत हा चालता फिरता कोरोनाचा मिकी संदेश देत आहे. या कोरोनाच्या मिकीच्या माध्यमातून लोकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती केली जात आहे. तसेच हा आगळावेगळा कोरोनाचा मिकी नागरिकांनाही आकर्षण ठरत आहे.
लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी वारंवार पोलीस लोकांना विनवणी करत आहेत. मागील लॉकडाऊनमध्ये तर अक्षरशः लोकांवर पोलिसांनी काट्या चालवल्या. परंतु मात्र लोक सुधारायला तयार नाही. त्यामुळे आता पोलिसांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. त्यामुळे आता या कोरोनाच्या प्रतिकृतीला पाहून तरी लोक धडा घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे, तरच आपण कोरोनावर मात करु अन्यथा कोरोनाच आपला घात करील.