मुंबई: राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी बातमी आहे. किरीट सोमय्या यांनी आपलं म्हणणं खरं करत महालक्ष्मी एक्स्प्रेस पकडून कोल्हापूरला रवाना झाले आहेत. ठाकरे सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. कोल्हापूर दौरा थांबवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी गृहमंत्र्यांनी आपल्या अटकेचे आदेश दिले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्यांनी कोल्हापुरात येऊ नये यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांनी नोटीसही बजावली आहे.
तर कोणत्याही परिस्थिती कोल्हापूरला जाणार असं सोमय्यांनी म्हंटलं होते. त्याप्रमाणे किरीट सोमय्या यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून महालक्ष्मी एक्स्प्रेस पकडली. त्यावेळी स्थानकात पोलीस आणि सोमय्या यांच्यात हायवोल्टेज ड्राम पाहायला मिळाला. पोलिसांनी सोमय्यांना अडवलं होतं. मात्र त्यांना जुगारून सोमय्या कोल्हापुरासाठी रवना झाले.
ठाकरे सरकारनं आपल्या घराखाली पोलिस बंदोबस्त ठेवल्याचंही किरीट सोमय्यांनी सांगितलंय. दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे किरीट सोय्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत.
भाजप नेते किरीट सोमय्यांवरील कारवाईवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केलीय. सोमय्यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदा असल्याचा आरोप त्यांनी केला होता.याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाणे, सातारा आणि कोल्हापुरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.