अमरावतीत आजपासून संचारबंदी शिथिल, ही सेवा पुन्हा सुरु

Amravati Violence News :  अमरावती (Amravati) शहरात हिंसाचारानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.  

Updated: Nov 20, 2021, 10:15 AM IST
अमरावतीत आजपासून संचारबंदी शिथिल, ही सेवा पुन्हा सुरु title=
संग्रहित छाया

अमरावती : Amravati Violence News : बंद आंदोलनादरम्यान तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्यानंतर शहरात हिंसाचार (Amravati Violence) उसळला होता. त्यामुळे अमरावती (Amravati) शहरात जमावबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, आजपासून संचारबंदीत सवलत देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं 9 ते 6 खुली राहणार आहेत. हिंसाचारानंतर अमरावती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. काल दुपारपासून अमरावतीत इंटरनेटही (Internet service) सुरू करण्यात आली आहे. 

अमरावतीमध्ये सात दिवसांपासून बंद असलेली इंटरनेट सेवा सुरु झाली आहे. नेट बंद असल्यामुळे अनेकांची मोठी गैरसोय झाली होती. शिवाय यामुळे अनेक व्यवहार ठप्प झालेत आणि व्यावसायिकांचं मोठं नुकसान झाले. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन काम करणाऱ्यांचे मोठी गैरसोय झाली होती. आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Curfew relaxed in Amravati from today, Internet service resumed)

गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारामुळे अमरावतीत कलम 144 लागू करण्यात आले होते. पण आजपासून संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. अमरावतीत आजपासून जीवनावश्यक सेवेतली दुकानं आणि कृषी सेवा केंद्र सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. शहरात तब्बल आठवडाभर संचारबंदी होती. मात्र आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. 

दरम्यान, अमरावतीमध्ये आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संचारबंदीमुळे शहरात औषधांचा तुटवडा जाणवू लागलाय. हार्ट अटॅकचं इंजेक्शन संपण्याच्या मार्गावर असून डेंगूसह अन्य अजारांवरील औषधांचीही टंचाई जाणवू लागलीये. सात दिवसांच्या संचारबंदीमुळे विक्रेत्यांना 25 कोटींचा फटका बसल्याचा अंदाज आहे.