समुद्रात 'निसर्ग', तर सोशल मीडियावर मीम्सचं वादळ

सोशल मीडियावर मीम्सच्या वाद        

Updated: Jun 3, 2020, 12:28 PM IST
समुद्रात 'निसर्ग', तर सोशल मीडियावर मीम्सचं वादळ title=

मुंबई : कोरोना व्हायरसशी लढा सुरु असतानाच महाराष्ट्रावर एक नवं संकट घोंगावत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर निसर्ग नावाचं चक्रीवादळ धडकणआर असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आता या वादळाला तोंड देण्यासाठीचे मार्ग अवलंबात आणले जात आहेत. एनडीआरएफच्या तुकड्यायही मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी अशा भागांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. हे निसर्ग चक्रीवादळ १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान किनारपट्टीवर धडकणार असल्याचं सांगितले जात आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टीलगत राहणाऱ्या रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. शिवाय ज्या समुद्रकिनाऱ्यालगत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याठिकाणी एनडीआरएफची पथकं देखील तैनात करण्यात आली आहे. 

ऐकीकडे समुद्रकिनाऱ्यावर वादळी वारे वाहत आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर मीम्सच्या वादळाने जोर धरला आहे. सोशल मीडियावर २०२० हे साल संकटांनी भरलेलं आहे अंस देखील मीम्सच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. 

दरम्यान देशात कोरोनाचं वादळ अद्यान शमलेलं नाही, त्यात निसर्ग चक्रीवादळ हे नवं संकट महाराष्ट्रासमोर उभं राहीलं. या संकटाला सामोरे जाण्यासाठी  प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं सांगण्यात येत आहे. या वादळाचा मोठा फटका अलिबाग किनारपट्टीला लगणार आहे. शिवाय मुंबईत देखील वादळाचे परिणाम पहायला मिळत आहेत. राज्यात हलका ते मध्य स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.