शिवलिंगाला वेटोळे घालून नागराजाने केले असे नृत्य... पहाच हा व्हिडिओ...

अंगावर काटा आणणारा हा थरार मोबाईल कॅमेरात कैद झाला असुन सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.. नक्की पहा हा व्हिडिओ...  

Updated: May 7, 2022, 10:31 AM IST
शिवलिंगाला वेटोळे घालून नागराजाने केले असे नृत्य... पहाच हा व्हिडिओ... title=

हेमंत चापुडे, झी मिडिया, जुन्नर : कोणत्याही शिव मंदिरात गेल्या तिथे शिवलिंगाला वेटोळे घालून बसलेल्या नागाची प्रतिकृती दिसते.. पण हाच नाग प्रत्यक्षात शिवलिंगाला वेटोळे घालून बसल्याचे दिसले तर? 

जुन्नर येथील एका शंकराच्या मंदिरात असाच एक नाग फणा काढून शिवलिंगावर बसून असल्याचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. हा नाग सरपटत मंदिरात शिरला. हळूहळू त्याने शिवलिंगाचाही ताबा घेतला.

शिवलिंगावर बसून तो मोठ्या डोलाने फणा इकडे तिकडे करू लागला. जणू तो नृत्याचं करत आहे. त्याच्या या लिलेत कुणी तरी बाधा आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने फुस्स्स्स करत तो डाव उधळून लावला. भाविकांनी मंदिरात घंटानाद करून शंकराची पूजा करण्यास सुरुवात केली असत तो शांतपणे तसाच वेटोळे घालून बसला.

अंगावर काटा आणणारा हा थरार मोबाईल कॅमेरात कैद झाला असुन सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.. नक्की पहा हा व्हिडिओ...