Dapoli Accident: दापोली येथील आसूद जोशी आळीत ट्रक आणि वडापची टक्कर होऊन भीषण अपघात झाला होता.. या अपघतात चार जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये 2 मुली आणि 2 पुरुषांचा सामावेश आहे. आतापर्यंत
मृतांचा आकडा ८ पर्यंत पोहोचला आहे. या अपघातातील पाच जखमींना उपचारासाठी मुंबईला आणण्यात आले होते. दरम्यान या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तात्काळ देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून अपघाताविषयी सविस्तर माहिती घेतली.
तसेच अपघातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला काही प्रवासी जखमी आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
मरियम गौफिक काझी (वय 6 वर्षे), स्वरा संदेश कदम (वय 8 वर्षे), संदेश कदम ( वय 55 वर्षे) फराह तौफिक काझी ( वय 27 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण अडखळ येथे राहणारे आहेत. तर, हर्णै अनिल उर्फ बॉबी सारंग ( वय 45 वर्षे) यांचा देखील मृत्यू झाला आहे. तर विनायक हशा चौगुले ( वय 45 वर्षे), श्रध्दा संदेश कदम ( वय14 वर्षे), मिरा महेश बोरकर (वय 22 वर्षे), सपना संदेश कदम ( वय 34 वर्षे), भुमी सावंत (वय17 वर्षे), मुग्धा सावंत ( वय 14 वर्षे), वंदना चोगले ( वय 38 वर्षे), ज्योती चोगले (वय 9 वर्षे), पंढरी, विनोद चोगले (वय 30 वर्षे) अशी जखमींची नावे आहेत.
दापोली हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारच्या सुमारास ट्रक आणि मॅजिक प्रवासी रिक्षा यांच्यात धडक होवून भीषण अपघात झाला. या भीषण अपघात 14 जण जखमी झाले आहेत. त्यातील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात हर्णै येथील प्रवासी मॅजिक चालक अनिल उर्फ बॉबी सारंग यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ट्रक चालकाच्या चुकीमुळे पाच जणांना जीव गमवावे आहेत.