ठाणे : १९९२ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी, कुख्यात दाऊद इब्राहिमची प्रकृती ठीक आहे. तसेच काही दिवसांपूर्वी दाऊदवर पाकिस्तानातील आगा खान रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, आता त्याची प्रकृती ठीक आहे. त्याला किडनीचे आजार आहेत अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
इकबाल कासकरचं जीमेल अकाऊंट आहे. इकबाल कासकरने २००३ मध्ये त्याच्या मुलानं त्याला हे जीमेल अकाऊंट उघडून दिलं होतं. त्याचा पासवर्ड इकबाल विसरण्याचं नाटक करत आहे. यासाठी ठाणे पोलीस आता गुगलकडे चौकशी करणार आहेत. तर आणखी तीन तक्रारदार काही दिवसांत समोर येऊ शकतात अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.